ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

आपण जबाबदरीपूर्वक वागल्यास प्रभू वैद्यनाथाच्या कृपेने कोरोना पुन्हा आटोक्यात येईल – धनंजय मुंडे

आपण जबाबदरीपूर्वक वागल्यास प्रभू वैद्यनाथाच्या कृपेने कोरोना पुन्हा आटोक्यात येईल – धनंजय मुंडे

महाशिवरात्री निमित्त बीड जिल्हा वासीयांना दिल्या शुभेच्छा, यंदा यात्रा नाही, घरीच शिवपूजन करण्याचे आवाहन

मुंबई (दि. १०) —- : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे आकडे वाढत असताना जिल्हा प्रशासनाने गांभीर्यपूर्वक निर्णय घेतले आहेत. सर्व नागरिकांनी जबाबदरीपूर्वक नियमांचे पालन केल्यास प्रभू वैद्यनाथ कृपेने कोरोना पुन्हा आटोक्यात आणता येईल, यासाठी सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी केले आहे.

धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा मंदिरातील प्रवेश बंद केले असून यात्रांवर देखील बंदी घातली आहे.

परळी हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या वास्तव्याने पावन झालेले शहर आहे. दरवर्षी येथे महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते. त्याचबरोबर नगर परिषदेच्या वतीने शिवरात्री महोत्सवाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी प्राप्त परिस्थितीमुळे यात्रा महोत्सवाचे आयोजन रद्द करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील अन्य शिवालयांमध्ये देखील यात्रा भरणार नाहीत.

मागील काही महिन्यात सर्व धर्माच्या विविध सण-उत्सवांवर कोरोनामुळे निर्बंध लागले आहेत. परंतु बीड जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संयमाने या परिस्थितीचा सामना करत घरच्या घरी विविध सण-उत्सव साजरे केले. याबद्दल जिल्हा वासीयांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे, असेही ना. मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

error: Content is protected !!