ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नागपुरात पोहचताच थेट आरएसएस’चे मुख्यालय गाठून संरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता एका नव्या चर्चेला राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरवात झालेली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, भैय्याजी जोशी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये बंद दरवाजाआड तब्बल दीड तास चर्चा झाली. ही बैठक अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यासंबंधी माहिती देण्यात आली नाही.
दरम्यान यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पुन्हा एकदा फडणवीसांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. आधिवेशनात काहीच फलित नाही, सगळ्यात महत्वाचे की विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची निराशा झाली असे त्यांनी बोलून दाखविले होते.

यावेळी सामनामधून करण्यात आलेल्या टिकेबद्दल विचारण्यात आले तेव्हा फडणवीस म्हणाले की, जनहिताचे मुद्दे उचलणं जशी आमची जबाबदारी आहे तशी वृत्तपत्रांचीदेखील आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे हे लक्षात आलं आहे असा टोला लगावला होता.

error: Content is protected !!