ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

वडुले येथे संबधितांवर कारवाईसाठी उपोषण

कार्यकारी संपादक-महेंद्र लोहोट

अहमदनगर-मुळा पाटबंधारेची जमीन हडपण्याचे प्रकरण
कुकाणे:येथील मुळा पाटबंधारे विभागाची जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात महसूल यंत्रणेचा हात असल्याचे उघड झाल्याने मंडलाधिकारी तलाठी व सबधितांवर कारवाईच्या मागणीसाठी छावा संघटनेचे संजय पवार यांनी वडुले येथे उपोषण सुरू केले
जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर वडुले येथील ग्रामपंचायत कार्यालया नजिकच्या लक्ष्मी माता मंदिरासमोर उपोषण सुरू केले निवेदनात म्हटले आहे की कुकाने येथील मुळा पाटबंधारे जमीन असलेली खाजगी व्यक्तीची नावे लावून वर्ग 2 ची 1 करून हडपण्याचा प्रकार उघडकीस आला,यात प्रथमदर्शनी मंडलाधिकारी तलाठी यांच्या संगमताने हा प्रकार झाल्याचे समजले हा प्रकार गंभीर असून जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाचा विचार करून संबधीत अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याचे आदेश द्यावे अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे पवार यांनी सांगितले
नेवासा तहसीलदार मा.रुपेशकुमार सुराणा यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पुढील कारवाईचे आश्वासन दिले.व मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे फोन वरून बोलणे करून दिले. जिल्हाधिकारी भोसले साहेब यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करून या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण उपोषण मागे घेत आहोत पण आपला हा लढा असाच चालू राहील.असे छावाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले

error: Content is protected !!