ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट

मुंबई : कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार आणि विश्वास नांगरे पाटील यांच्यात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. मागच्या कधी दिवसांपासून पूजा चव्हाण, सचिन वाझे प्रकरण, मनसुख हिरेन अशा विविध प्रश्नांमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.

मागच्या काही दिवसांपासून राज्यात विविध मुद्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला घेरले आहे. विधानसभेत याचे पडसाद उमटले आणि मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता. यावरून विरोधकांनी आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याचे बोलले जात आहे.

या दोघांच्या चर्चेदरम्यान डेलकर, मनसुख हिरेन आणि वाझे प्रकरणावर देखील या भेटीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी याच्या घराबाहेर स्फोटके भरलेली कार पार्क करण्यात आली होती. या प्रकरणावर देखील दोघांची चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

error: Content is protected !!