ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

“संपूर्ण जग सामनाची दखल घेत आहे” संजय राऊतांचा फडणवीसांना टोला 

 

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना आग्रलेखावरून होणाऱ्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले होते. आता देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावल्यानंतर खासदार संजय राऊत यांनीदेखील फडणवीसांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं आहे.

फडणवीसांनी सामनावर केलेल्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “सामना वाचतात हे त्यांनी कबुल केलं. सामना वाचणं सुंदर सवय आहे. महाराष्ट्र, देशात सत्य काय घडतंय त्याची माहिती सामनामधून मिळत असते. संपूर्ण जग सामनाची दखल घेतं. त्यामुळे देवेंद्रजींना चांगली सवय लागली असेल तर मी त्यांचं कौतुक करतो” असा टोला त्यांनी लगावला.

आज सकाळी देवेंद्र फडणवीस नागपुरात दाखल झाल्यानंतर त्यांनी वृत्तसमूहाची बोलताना ते म्हणाले की, जनहिताचे मुद्दे उचलणं जशी आमची जबाबदारी आहे तशी वृत्तपत्रांचीदेखील आहे. आम्ही वीजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे हे लक्षात आलं आहे” असा टोला सेनेला लगावला होता.

error: Content is protected !!