ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

वैद्यनाथ कारखाना पूर्ववत सुरू ; शेतकऱ्यांच्या ऊस गाळपात आता अडथळा येऊ देणार नाही.

वैद्यनाथ कारखाना पूर्ववत सुरू ; शेतकऱ्यांच्या ऊस गाळपात आता अडथळा येऊ देणार नाही.

🔸अशोक काळकुटे | संपादक

पंकजाताई मुंडे यांच्यावर कर्मचारी युनियनने केला विश्वास व्यक्त.

▪️परळी । प्रतिनिधी.
दिनांक ११।
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आजपासून पुन्हा सुरळीत चालू झाला आहे. शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप करू, यात कसलाही अडथळा आता येऊ देणार नाहीत असा शब्द देत कर्मचारी युनियनने कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांच्यावर आपला ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

यासंदर्भात वैद्यनाथ कारखाना कर्मचारी युनियनचे अध्यक्ष विष्णू तांबडे व उपाध्यक्ष बालासाहेब मुंडे यांनी कारखाना प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,आम्ही, सर्व वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना युनियन हे स्पष्ट करू इच्छितो की, आमची कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या ॲडव्हान्स बद्दल कारखान्याच्या मॅनेजमेन्टशी चर्चा चालू होती. ही चर्चा सकारात्मक वळण घेत असतांना कांही लोकांनी यामध्ये हस्तक्षेप व मुजोरी करून कारखाना बंद पाडला आणि यामुळे बाहेर मिडियामध्ये बातमी पसरली. कांही चॅनलने १९ महिन्याचे पगार रखडले अशी बातमी दिली. परंतू कारखाना सुरू होऊन चारच महिने झालेले आहेत, आणि मागील वर्षी कारखाना ऊसा अभावी बंद होता.आमची मॅनेजमेन्टशी चर्चा संपूर्ण होऊन आम्हाला हवी असलेली मागणी मान्य झालेली आहे. तरी कारखाना हा आमचा परिवार असून कारखान्याची नाहक बदनामी झाली याबद्दल खंत व्यक्त करतो. आता आम्ही कारखाना सुरळीत सुरू करून चालवू आणि शेतकऱ्यांचे हाल होऊ देणार नाहीत याची जबाबदारी मॅनेजमेन्ट सोबतच आमची देखील आहे असे नमुद केले आहे.

error: Content is protected !!