ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

प्रा.किसन चव्हाण,फारुक अहमद, गोविंद दळवी,नागोराव पांचाळ यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर निवडी.

प्रा.किसन चव्हाण,फारुक अहमद, गोविंद दळवी,नागोराव पांचाळ यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर निवडी.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️बीड | प्रतिनिधी.
– महाराष्ट्रतील बहुजन चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते शेगावचे प्रा. किसन चव्हाण, नांदेडचे प्रभावी वक्तृत्व असलेले फारूक अहमद, गोविंद दळवी तसेच परभणीचे ओबीसी दांडगा जनसंपर्क आसलेले नेते नागोराव पांचाळ या सर्वाची वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खा.ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली आहे.

प्रा. किसन चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेपासून ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत राज्यभर कार्यरत आहेत. संघटन कौशल्य आणि कुठलाही प्रश्न धसास लावण्यासाठी रस्त्यावर उतरून, प्रसंगी शासन व प्रशासन यांना धारेवर धरून कोंडीत पकडणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि वंचित बहुजन आघाडीची मुलुख मैदानी तोफ अशी स्वतःची वेगळी ओळख त्यांनी आपल्या कार्य कर्तृत्ववाद्वारे राज्यभर निर्माण केली आहे.
अहमद हे मुस्लिम समाजाचे नेतृत्व व प्रभावी वक्ता म्हणून त्यांना पण या ठिकाणी संधी देण्यात आली तसेच गोविंद दळवी प्रभावी वक्तृत्व असलेले मायक्रो ओबीसी नेते तर नागोराव पांचाळ देखील त्यांच्या चांगल्या जनसंपर्क मुळे राज्य कार्यकारिणी व वर्णी लागली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा असणारे माजी खा. ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे अत्यंत निकटवर्तीय, विश्वासू आणि निष्ठावंत कार्यकर्ता अशीही सर्वांची ओळख आहे. वंचित बहुजन आघाडीच्या स्थापनेनंतर मराठवाड्याचे निरीक्षक, प्रदेश महासचिव, राज्य प्रवक्ते व आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक तसेच पार्लमेंटरी बोर्ड सदस्य म्हणूनही ते काम पाहतात.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शेवगाव पाथर्डी मतदार संघातून उमेदवारी केली होती. व पहिल्याच प्रयत्नात त्यांनी १० हजाराहून अधिक मते मिळवली. गाव, तालुका, जिल्हा, विभाग, व राज्य पातळीवर विविध प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलने, धरणे, मोर्चे, रास्ता रोको अशी लोकशाही पद्धतीने आंदोलने केली आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांमुळे उत्साह निर्माण झाला आहे. या सर्वांच्या निवडीमुळे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रत अधिक मजबूत व प्रभावीपणे ते काम करण्यास सक्षम पणे तयार झालेली दिसून येत आहे यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!