ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

एम.पी.एस.सी परिक्षा रद्द केल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला-पंकजाताई मुंडे.

एम.पी.एस.सी परिक्षा रद्द केल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला-पंकजाताई मुंडे.

🔸अशोक काळकुटे | संपादक

चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल ट्विट करत व्यक्त केली तीव्र नापसंती.

मुंबई । दिनांक ११।
राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा रद्द करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा असून यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे, या निर्णयाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करत तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परिक्षा येत्या १४ मार्च रोजी घेण्यात येणार होती. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत सरकारने ही परिक्षा अचानक रद्द केली, यापूर्वी देखील परिक्षा स्थगित करण्यात आली होती. सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचे ट्विट पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. एमपीएससी चा अभ्यास करणारे बहुतांश विद्यार्थ्यी हे ग्रामीण भागातील आहेत, अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत पुणे किंवा अन्य शहरात राहून करिअर घडविण्यासाठी अतिशय मेहनत घेऊन रात्रंदिवस अभ्यास करतात. कोरोनाचे नियम पाळून इतर सर्व व्यवहार चालू आहेत मग परिक्षा का नको ? असा सवाल त्यांनी केला. परिक्षा रद्द केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची वय निघून जातील, त्यांची मेहनत व्यर्थ जाईल तसेच त्यांचे भविष्य देखील अंधःकारमय होईल. सरकारच्या या निर्णयाने सर्वच विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, त्यांना न्याय द्यावा असेही पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!