ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

 

 पुणे दि ११ : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज पुणे येथील संजीवन हॉस्पिटल येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेतली. लस घेण्यामध्ये कुठलीही भीती बाळगू नये. सध्या पुन्हा कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. पण भारतामध्ये तयार करण्यात आलेल्या कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीमुळे कोरोनापासून आपणास संरक्षण मिळणार आहे.

लसीसाठी ज्या व्यक्ती पात्र आहेत त्या प्रत्येक व्यक्तीने ही लस घ्यावी. स्वदेशी बनावटीची ही लस परिणामकारक आहे. भारताने आपली कोरोना प्रतिबंधक लस अनेक देशांना मोफत देऊन जगामधील कोरोना विरोधाच्या लढ्यात एक नवीन आदर्श जगासमोर ठेवला आहे, असेही दादा पाटील यांनी सांगितले.

लस उपलब्ध असली तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे या तीनही गोष्टी महत्वाच्या आहेत. आपापली कामे करताना आपली व कुटुंबियांची काळजी घ्या असे आवाहनही दादा पाटील यांनी केले.

error: Content is protected !!