ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

कर्जत तालुका आजी माजी सैनिक सेवा फौंडेशन चा प्रथम वर्धापन दिन संपन्न

कर्जत तालुका आजी माजी सैनिक सेवा फौंडेशन चा प्रथम वर्धापन दिन संपन्न

कर्जत (प्रतिनिधी):- कर्जत तालुका आजी-माजी सैनिक सेवा फौंडेशनची मुहूर्तमेढ एकवर्षांपूर्वी रोवली गेली होती, आज वर्ष पूर्ती निमित्त हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करून फौंडेशनचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता फौंडेशनचा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा न करता कर्जत येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला, तसेच नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्जत शहराला स्वच्छ व सुंदर ठेवणाऱ्या नगरपंचायत च्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान आजी माजी सैनिक सेवा फौंडेशन तर्फे त्यावेळी करण्यात आला.
तसेच नुकतेच भारतीय सेनेतून सेवानिवृत्त झालेले सुनिल भवर व मनोहर लाळगे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ यांनी कर्जत तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबियांना यावेळी शुभेच्छा दिल्या व कर्जत तालुक्याच्या सेवेसाठी आजी-माजी सैनिक संघटना नेहमी तत्पर राहील असे सांगितले ते पुढे म्हणाले की, फौंडेशनच्या स्थापनेनंतर काही दिवसातच कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगावर ओढवले‌, 22 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रात लॉकडाउन ची घोषणा झाली, त्या काळात संघटनेच्या 30 ते 40 माजी सैनिकांनी व सुट्टीवर असलेल्या सैनिकांनी कर्जत तालुक्यात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कोरोना पासून बचाव करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीचे मोठे कार्य केले, व संघटना सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असते. आता सध्या 2 ऑक्टोबर 2020 पासून कर्जत शहरामध्ये सुरू असलेले स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्व सामाजिक संघटनांनी उभे केलेले श्रमदानातून स्वच्छतेच्या व वृक्षारोपणाच्या निरंतर कार्यामध्ये माजी सैनिक मोठ्या हिरीरीने सहभागी आहेत असे म्हटलेे.
यावेळी कर्जत नगरपंचायत चे मुख्याधिकारी गोविंद जाधव साहेब, कर्जत तालुका आजी-माजी सैनिक सेवा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ, सचिव सुनील साळुंके, खजिनदार श्रीकांत मारकड, सत्यवान शिंदे, रामदास फरांडे, अरुण माने, गंगाराम बनसोडे, जालिंदर जमदाडे, सतीश सुपेकर, सूर्यकांत निंबाळकर, अनिल खाकाळ, राजू तोरडमल, शिवाजी तोरडमल, दत्तू बंडगर इ.माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व स्वच्छता अभियानात सहभागी असलेले सर्व सामाजिक संघटनांचे विजू काका तोरडमल, नितीन देशमुख, विशाल मेहत्रे, काकासाहेब काकडे, राजू बागवान, पारखे सर, अशोक नेवसे सर, दत्तात्रय गदादे सर, राजेंद्र पठाडे, संजय लाळगे, भाऊसाहेब तोरडमल इत्यादी स्वच्छता दूत व पत्रकार बांधव सहभागी झाले होते.

error: Content is protected !!