ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

कुसडगाव येथे 215 रुग्णांनी मोफत आरोग्य तपासणी केली. आमदार रोहीत पवार यांच्या प्रयत्नाने तालुक्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू

कुसडगाव येथे 215 रुग्णांनी मोफत आरोग्य तपासणी केली.

आमदार रोहीत पवार यांच्या प्रयत्नाने तालुक्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुरू

जामखेड( कुसडगाव) – आमदार रोहित पवार यांच्या मार्फत कुसडगाव, भोगलवाडी, सरदवाडी येथे मोबाईल क्लिनिक व्हॅन,फिरता दवाखाना, मोफत औषधे ( सर्वसाधारण आजाराकरीता) आरोग्य तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी,प्रथोमोपचार शिबिर आज कुसडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित करण्यात आले होते .

यावेळेस आरोग्य अधिकारी यांनी गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याची तपासणी करून मोफत गोळ्या औषधे उपलब्ध करून देण्यात आली तसेच सर्व रोगावरील उपचार मोफत करण्यात आले.

यावेळी बोलताना सरपंच बापूसाहेब कार्ले म्हणाले की ,आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून मतदार संघातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी मोबाइल क्लिनिक ची सुविधा प्रत्येक गावासाठी करण्यात आली आहे तसेच बीपी व शुगर यावर या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून किरकोळ आजारावर व बीपी व शुगर यावर मोफत औषधोपचार होणार आहेत.
45 वर्षाच्या पुढच्या लोकांसाठी ही आरोग्य सेवा मोफत दिली जाणार , तज्ञ डॉक्टर यांची टीम तपासणी यंत्रणा बरोबर आरोग्य सुविधेचा नागरिकांसाठी फायदा होणार आहे .
या फिरत्या दवाखान्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा.

यावेळी सरपंच बापूशेठ कार्ले, उपसरपंच नागेश कात्रजकर, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रसन्न कात्रजकर ,ग्रामसेवक टकले, बिबीशन जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य पै. अंकुश कात्रजकर,ग्रामपंचायत सदस्य शहाजी गाडे , संतोष भोगल,पै प्रदीप कात्रजकर, आरोग्य समन्वयक मारुती बारस्कर ,शेषराव कात्रजकर ,
डॉ.गणेश गायवळ आरोग्य कर्मचारी दत्ता गीते,सतीश डीसले व कुसडगाव मधील ग्रामस्थ उपस्थित होते या शिबिरा मध्ये 215 रुग्णांनी तपासण्या केल्या तसेच या शिबिरास मोठ्या प्रमाणात रुग्णांनी सहभाग नोंदवला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रसन्न कात्रजकर यांनी आमदार रोहित पवार यांचे आभार मानले.

error: Content is protected !!