ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

कोरोना पॉझिटीव्ह पेशंटला सरकारी दवाखान्यात निकृष्ट दर्जाचे जेवण ; जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले -ॲड.अजित देशमुख.

कोरोना पॉझिटीव्ह पेशंटला सरकारी दवाखान्यात निकृष्ट दर्जाचे जेवण ; जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातले -ॲड.अजित देशमुख.

🔸अशोक काळकुटे | संपादक

▪️बीड | प्रतिनिधी.
कोरोना पॉझिटीव्ह पेशंटवर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीने जेवण न देता रुग्णालयात निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. करपलेल्या आणि काळ्या चपात्या या निकृष्ट दर्जाच्या गव्हाच्या दिल्या जात आहेत. ही बाब जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी यात तात्काळ लक्ष घातले आहे. दरम्यान शल्य चिकित्सक गिते यानी संबधीत कंत्राटदारास नोटीस काढत असल्याचे आम्हाला सांगितले आहे, अशी माहिती जण आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिली आहे.

पेशंटच्या अनेक दिवसांपासून तक्रारी होत्या. या बाबत एका चपातीच्या फोटोसह जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची प्रत सिव्हिल सर्जन गिते यांनाही देण्यात आली होती. मात्र गीते यांनी तक्रारीकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी जगताप यांच्या आदेशानंतर जिल्हा रुग्णालय हलले.

दरम्यान, गीते यांनी जन आंदोलनाशी संपर्क साधून याबाबत माहिती घेतली. आणि संबंधित कंत्राटदार याला नोटीस काढत असल्याचे सांगितले. रुग्णांना अशा प्रकारचे जेवण देणे योग्य नाही. ही बाब चुकीची आहे.

कोरोना रुग्णांनी घाबरू नये. त्याचप्रमाणे दवाखान्यात योग्य उपचार मिळतात. त्यामुळे खाजगी दवाखान्यात जाऊन जादा खर्च करू नये. सगळीकडे एकच उपचार आहेत. त्यामुळे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांनी सरकारी दवाखान्यात उपचार करून घेण्याची मानसिकता ठेवावी. जर काही कमतरता असेल तर ती जिल्हा रुग्णालय प्रशासनाला अथवा आम्हाला सांगावी.

जिल्हा रुग्णालयात जेवणाच्या कंत्राटावर लाखो रुपये खर्च केले जातात. जेवण, नाष्टा, वगैरे कसे द्यावे, याबाबत शासनाचे आदेश आहेत. मात्र याचे पालन केले जात नाही. रुग्णालय प्रशासनाने यावर लक्ष दिले पाहिजे. कारण रुग्णांना सेवा देणे प्रशासनाचे काम आहे.

जन आंदोलन कोरोना महामारीच्या काळात सुरवातीपासून सक्रिय आहे. त्यामुळे कोरोना आणि जनता यांचा आमचा सातत्याने संपर्क आहे. या काळात आम्ही अनेक लोकहिताची कामे केली आहेत. आम्ही कोरोना काळात जनतेसोबत आहोत. जनतेनेही नियम पाळावेत, असेही ॲड. देशमुख यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!