ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

भारत लोकशाही प्रधान देश राहिला नाही, राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी एक ट्वीट करुन भारत आता लोकशाहीप्रधान देश राहिला नाही, असे म्हटले आहे. यावेळी राहुल गांधी यांनी एका विदेशी इन्स्टिट्यूटचा हवाला दिला आहे. राहुल गांधी यांच्या या टीकेला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी हे तर एजंट असल्याची टीका भाजपनं केली आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये एक फोटो शेअर केला आहे. पाकिस्तानप्रमाणेच भारतही ऑटोक्रेटिक आहे. भारताची स्थिती बांग्लादेशपेक्षाही खराब आहे, असे या फोटोमध्ये लिहिले गेले आहे. स्वीडनमधील एका इन्स्टिट्यूटचा डेमोक्रसी रिपोर्टचा हवाला राहुल गांधी यांनी दिला आहे.

तसेच तत्पूर्वी स्विडनमधील व्ही-डेम या जगविख्यात इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात दावा केला आहे की, “भारत आता ‘इलेक्टोरल डेमोक्रसी’ राहिला नाही. तर भारताचे आता ‘इलेक्टोरल ऑटोक्रॅसी’च्या रुपात वर्गीकरण केले जाऊ शकते. जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान असलेला भारत आता इलेक्टोरल ऑटोक्रॅसी बनला आहे असे त्या आव्हालात म्हटले आहे.

error: Content is protected !!