ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

हिंजवडीत बांधकाम मजुरामुळे डोकेदुःखी वाढली

प्रतिनिधी-निता भोसले

पिंपरी चिंचवड-(दि.१२)
हिंजवडी:आयटीनगरी माण परिसरात अनेक नामांकित बांधकाम प्रकल्प सुरू असल्याने गावच्या वैभावात नक्कीच भर पडत आहे. मात्र हेच बांधकाम प्रकल्प आता येथील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनले आहे. येथील काम करणारे मजूर परिसरातील शेतांमध्ये विनापरवानगी घुसून पिकांची नासधूस करत आहेत. शेतातील पिके फळ भाजीपाला, कडधान्य,ऊस मोठ्या प्रमाणात चोरून नेत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. कोरोना मुळे आधीच शेतकरी अडचणीत आला आहे.त्यात शेतीला हमीभाव, बाजारभाव नाही,कोरोनामुळे नोकऱ्या गेल्या कुठेतरी शेतीवर उदरनिर्वाह चालतोय तर या बांधकाम प्रकल्प मजुरांकडून त्रास होतोय.
परिसरातील शेतकऱ्यांनी मजुरांना अनेकवेळा रंगेहाथ पकडून समजावून सांगत समज दिली आहे.माण ग्रामपंचायत हद्दीत बोडकेवाडी फाटा ते आर्चीव्हल शाळा रस्ता परिसरात मोठे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत.या ठिकाणी शेकडो मजूर रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांच्या राहण्याची सोय प्रकल्पाच्या ठिकाणी तसेच जवळपास लेबर कॅम्प तयार करून करण्यात आली आहे.मजुरांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे संबंधित ठेकेदाराचे काम आहे. सर्व विषयाची तत्काळ माहिती घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे आयटीनगरी माण चे ग्रामविकास अधिकारी भरत पाटील यांनी सांगितले.

error: Content is protected !!