ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

या सरकारमध्ये बेबंदशाही चालू आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे प्रत्येक मंत्री सतत घेतात वेगवेगळी भूमिका – चंद्रकांत पाटील

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तारीख ठाकरे सरकारकडून पुढे ढकलण्यात आल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पुणे, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर, नाशिक आदी शहरांत एमपीएससी परीक्षार्थी रस्त्यावर उतरले होते. यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. ते आज पुणे येथे पत्रकार माध्यमांशी बोलत होते.

या सरकारमध्ये बेबंदशाही चालू आहे. त्याचं उदाहरण म्हणजे प्रत्येक मंत्री सतत वेगवेगळी भूमिका मांडताना दिसून येतात. यातून या सरकारमधील मंत्र्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ दिसून येत नाही. सरकारमधील प्रत्येक घटक वेगळी भूमिका मांडतो. हे एक नंबर लबाड सरकार आहे अशा शब्दात चंदकांत पाटील यांनी टीका केली आहे.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, “तुम्ही परीक्षेची तारीख जाहीर करणार म्हटलात पण विद्यार्थ्यांनी तुमच्यावर का विश्वास ठेवायचा?,” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. तसेच हे सरकार विद्यार्थ्यांपासून शेतकरी वर्गापर्यंत कोणतेही प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती.

राज्यातील जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मात्र मला एकच वाटतं की स्वतः मुख्यमंत्र्यांनी नो लॉकडाउन अशी भूमिका जाहीर करावी,असं त्यांनी बोलून दाखवलं होत, जिथे जिथे गर्दी असेल तिथे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. तसंच प्रशासनाने त्याबाबत सक्ती केली पाहिजे, असे पाटील यांनी बोलून दाखविले होते.

error: Content is protected !!