ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

पुण्यात लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध अधिक कडक

पुणे : मुंबई पाठोपाठ पुणे शहरात सुद्धा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाऊन जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र पुण्यात सध्या संचारबंदीच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे, हा कालावधी रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत असून त्यात कोणताही बदल करण्यात आला नाहीत. मात्र, इतर गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज करोना आढावा बैठक घेतली आहे. यावेळी या बैठकीत करोनाचा संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सहा प्रकारचे निर्बंध लावण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर आजच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित होते.

पुण्यात ॲक्टिव रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक असल्यामुळं १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना सरसकट लस देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविणार आहे. सध्या २३ ते २४ हजार लोकांना लस देण्यात येत आहे. हे प्रमाण वाढविले तर परिस्थिती आटोक्यात येईल अशा माहिती विभागीय आयुक्तांनी दिलेली आहे.

error: Content is protected !!