ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

कृषि महाविद्यालयामध्ये स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

कृषि महाविद्यालयामध्ये स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

अंबाजोगाई( प्रतिनिधी):-

कृषि महाविद्यालय, अंबाजोगाई येथे महाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या हस्ते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या औचित्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छता व सुशोभीकरण केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डाॅ. बसवलिंगाप्पा कलालबंडी, डाॅ. अरुण कदम, डाॅ. प्रताप नाळवंडीकर, डाॅ. सुहास जाधव, डाॅ. विद्या तायडे, प्रा. संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, कर्मचारीवृंद व विद्यार्थी हजर होते. शासनाच्या कोविड नियमावलीचे तंतोतंत पालन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.

error: Content is protected !!