ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

सहाही बहिणी पोलीस दलात खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले कौतुक

मुंबई : एकाद्या गोष्टीची जिद्द बाळगल्यानंतर अशक्य ही शक्य होऊ शकते याची प्रचिती कोल्हापुरातील एका कुटुंबातील सख्या-चुलत बहिणींनी करून दाखवली आहे. याची दखल खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेऊन कौतुकाची थाप पाठीवर दिली आहे. या बहिणींच्या यशामुळे आता कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यातील वाघवे हे गाव जोरदार चर्चेत आले आहे.

पन्हाळा तालुक्यातील वाघवेवाडी या गावात भोसले कुटूंब राहते. सुरेश, चंद्रकांत आणि प्रकाश हे तीन भोसले बंधू या गावात राहतात. या तिन्ही भावंडांना मिळून एकूण सहा मुली आहेत. सुुवर्णा, सोनाली, रूपाली, सारिका, विमल आणि सुजाता, अशी या सहा बहिणींची नावे आहेत.

या सहाही बहिणी सध्या पोलिस विभागात राज्यांच्या वेगवेगळ्या विभागात आपले कर्तव्य बजावत आहेत. आपल्या मोठ्या बहिणीचा आर्दश घेत बाकीच्या पाचही बहिणींनी पोलिस विभागात जाण्याचा निर्णय घेतला आणि या सहाही जणी आज राज्याच्या विविध भागात आपले कर्तव्य बजावत आहेत.

error: Content is protected !!