ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

मुंबई साखळी स्फोटाला 28 वर्षे, शरद पवारांनी त्यावेळी एक स्फोट वाढवून का सांगितला होता?

मुंबई : 12 मार्च 1993 चा तो दिवस…ज्या दिवशी मुंबईच्या काळजात खोल जखम झाली. स्फोटांच्या मालिकेनं तब्बल 257 जणांचा जीव घेतला, 713 जण जखमी झाले. या दिवशी मुंबईत एकापाठोपाठ एक 12 स्फोट झाले. मात्र, हे 12 स्फोट नसून ते 11 स्फोट होते. त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आताच्या आताच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक स्फोट वाढवून सांगितला. म्हणूनच प्रश्न येतो, 11 स्फोट झालेले असताना शरद पवारांनी एक स्फोट का वाढवून सांगितला आणि मुख्यमंत्री असतानाही त्यांनी हे विधान का केलं? याच प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडीओत देतोय.

राम मंदिर आंदोलन…त्यानंतर बाबरी मशिद पाडण्याची घटना आणि त्यानंतर मुंबईत पेटलेल्या दंगली. काही वर्षात सलग घडलेल्या या घटना…याच घटनातून मुंबईत सिरीअल ब्लास्ट करण्यात आल्याचं बोललं जातं. 6 मार्चला शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली…आणि त्याच्या 6 दिवसांनंतर मुंबईत स्फोटांची मालिका घडली.

शरद पवार आपलं राजकीय आत्मचरित्र लोक माझा सांगातीमध्ये लिहतात…

मी सहव्या मजल्यावर कामकाजात गर्क होतो. बाराच्या सुमारास धमाडदिशा आवाज आला. मी खिडकीपाशी धावलो. पाहतो, तर एअर इंडियाच्या इमारतीतून लोक सैरावैरा पळताना दिसत होते. तो आवाज बाँबस्फोटाचाच आहे, याची मला खात्री होती.

मुंबईत पहिला स्फोट 1 वाजून 30 मिनिटांनी शेअर बाजाराच्या इमारतीत झाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक नरसी बाजार, शिवसेना भवन, सेन्च्युरी बाजार, हॉटेल जुहू सेंटॉर, झवेरी बाजार, प्लाझा सिनेमा, पासपोर्ट ऑफिस, सहार विमानतळ इथं स्फोट झाले. ही सगळी ठिकाणी हिंदूबहुल होती. आणि हीच गोष्ट शरद पवारांना चिंतेचे वाटत होती. या स्फोटाद्वारे पुन्हा दंगली घडवण्याचं षडयंत्र पवारांना जाणवलं.

पुढे शरद पवार लिहतात…

मी संरक्षण मंत्री राहिलेलो असल्याने, ही स्फोटकं साधी नाहीत हे मला जाणवलं. संरक्षण मंत्रालयात डॉ. अब्दुल कलाम हे माझे सल्लागार होते. त्यांना मी फोन केला आणि स्फोटकांचं वर्णन केलं. त्यानंतर या स्फोटात आरडीएक्सचा वापर झाल्याच्या माझ्या शंकेला दुजोरा मिळाला.

त्यावेळी आरडीएक्स दोनच ठिकाणी बनत होतं. पहिलं कराची आणि दुसरं पुण्यातील देहूरोड. पवारांनी देहुरोडच्या दारुगोळा कारखान्यात फोन करुन चौकशी केली. तेव्हा कळालं, त्या 2 वर्षात कारखान्यात 1 ग्रॅमही आरडीएक्स तयार करण्यात आला नव्हता. त्यामुळं हे आरडीएक्स कराची म्हणजेच पाकिस्तानातून आल्याचं पक्क झालं. आणि आंतरराष्ट्रीय धागेदोरे या स्फोटामागे असल्याने याचं गांभीर्य अधिक वाढलं.

त्याचवेळी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरु पवारांनी जनतेला संबोधित केलं. आणि यावेळी त्यांनी 11 स्फोट झाले असूनही 12 आकडा सांगितला…याचं कारण शरद पवारांनी पुस्तकात लिहलंय..

जनतेला महिती देत असताना, बॉम्बस्फोट अकरा ठिकाणी झाले असूनही, बारा ठिकाणी झाल्याचं जाणीवपूर्वक नमूद केलं. सर्व बॉम्बस्फोट हिंदूबहुल भागात झाले होते. परंतू कोणतीही जातीय प्रतिक्रिया उमटू नये म्हणून मी मस्चिद बंद या मुस्लिम भागातही स्फोट झाल्याचं सांगितलं. ही घटना एका धर्माने दुसऱ्या धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान नसून भारताविरोधात घडवून आणलेला कट होता. त्यामुळे परिस्थिती चिघळणार नाही, नियंत्रणात राहिल याची काळजी मी घेतली

मुंबई दंगलींच्या चौकशीसाठी श्रीकृष्ण आयोग नेमण्यात आला. त्यावेळी पवारांनाची चौकशी झाली. त्यावेळी स्फोटांचा आकडा का वाढवून सांगितला, हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पवारांनी सांगितलं की माझं विधान असत्य होतं, पण पुढील संभाव्य हिंसा थांबवण्यासाठी तो निर्णय घेतला होता. या वक्तव्यानंतर जेव्हा श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल प्रसिद्ध झाला, त्यावेळी पवारांचा उल्लेख त्यात धिस इज द एक्झांपल ऑफ स्टेटमनशीप असा करण्यात आला…म्हणजेच उत्तम राज्यकर्त्याचे हे उदाहरण असल्याचं म्हणण्यात आलं…

एकूणच शरद पवार यांनी त्यावेळीही दाखवलेला हा संयम आणि निर्णयक्षमता अधिक महत्त्वाची ठरली. त्यामुळे मुख्यमंत्री असताना त्यांनी असत्य विधान केलं असलं, तरी त्या विधानामुळे पुढील मोठा हिंसाचार टळला. मुंबईला पुन्हा सुरळीत करण्यासाठी त्यांचं हे विधान अधिक महत्त्वाचं होतं.

error: Content is protected !!