ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

सातबारावर लागणार सरकारचे नाव तहसीलदारांचे आदेश

कार्यकारी संपादक-महेंद्र लोहोट
थकबाकी:तहसीलदारांचे तलाठ्यांना आदेश
निफाड-तालुक्यातील ज्या शेत जमीनधारकांनी थकीत शेतसारा, अनधिकृत बिनशेती दंड यांचा वेळोवेळी नोटीसा बजाऊनही भरणा केलेला नाही, अशा थकबाकीदार खातेदारांच्या सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासन असे नाव लावण्याची कार्यवाही करावी असे आदेश तहसीलदार शरद घोरपडे यांनी तालुक्यातील तलाठ्यांना दिले आहेत.
आदेशात म्हटले आहे की अनेक शेती खातेदारांकडे व बिगरशेती खातेदारांकडे शासनाचे शेतसारा व बिगरशेती सारातसेच अनधिकृत बिनशेती दंड थकले आहेत. त्यांना वेळोवेळी कर भरण्याबाबत नोटीसा व नमुना ४,सक्तीच्या नोटीसही पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक खातेदार कर भरण्यास कसूर करत आहेत. अशा सर्व कसूर करणाऱ्या खातेदारांचे नाव कमी करुन सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासन असे नाव धाकल करण्याची कार्यवाही करण्यात यावी.त्यामुळे थकबाकी असणाऱ्या खातेदारांनी असणारी बाकी भरणा न केल्यास सातबारावर शासनाचे नाव लागणार आहे. यामुळे महसूल विभागाचा कर न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

error: Content is protected !!