ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

ग्रामविकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार सुनील शेळके

ग्रामविकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आमदार सुनील शेळके

वडगाव मावळ : दि.१२
पंचायत समिती सभागृहात आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
पहिल्या दिवशी मावळ तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. विकासकामांची असणारी सद्यस्थिती तसेच अनेक प्रलंबित विकासकामात असणाऱ्या समस्या व गावात कोणती कामे पूर्ण झाली आहेत, कोणती सुरु आहेत.याचा गावनिहाय आढावा घेण्यात आला.
‘ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजे, ज्यामुळे पायाभूत सुविधा सक्षम होण्यास मदत होईल. घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्य यासंबंधित नाविन्यपूर्ण प्रकल्प लोकसहभागातून राबविले पाहिजेत. शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवुन पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. रस्ते, वीज, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाड्या, शाळा या विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
अनेक गावात असणारे गावतळी, तलाव यांच्या नोंदी संबंधित विभागाने करून घ्याव्यात. अशा सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत.
यावेळी गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहा. गटविकास अधिकारी लक्ष्मण वाजे, ग्रामीण ब्लॉक आध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठलराव शिंदे, सभापती निकिता घोटकुले, पंचायत समिती सदस्य गुलाबकाका म्हाळसकर, शांताराम कदम तसेच सर्व विभागाचे अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते.

error: Content is protected !!