ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे थैमान सुरु

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात अमरावती, नागपूर, पुणे आणि मुंबई शहरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्णसंख्या अधिक प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. तसेच वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी अमरावती आणि नागपूर शहरात स्थानिक पातळीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.

त्यात राज्याच्या ग्रामीण भागात सुद्धा कोरोना रुग्ण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र कोरोनाच्या संकटात मुंबई आणि पुणेकरांना खास दिलासा देण्यात आला आहे. सध्या तरी या मोठ्या दोन शहरात लॉकडाऊन जाहीर करण्याचा कोणताही विचार नाही असे राज्य सरकारने आधीच जाहीर केले आहे.  मात्र परिस्थिती पाहून निर्णय बदलण्यात येईल असे सुद्धा सांगितले आहे.

सध्या मुंबईतील परिस्थिती आटोक्यात आहे असा दावा पालिकेचे आयुक्त सुरेश काकानी यांनी केला आहे. तर नागरिकांनी त्रिसूत्री पाळली तर लॉक डाऊनची वेळ येणार नाही असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. तर पुएनकारांवर कोणतेही नवे निर्णय न लादण्याचा निरयन घेण्यात आलेला आहे.

error: Content is protected !!