ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

कल्याणमध्ये करण्यात आलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामावर मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतली आक्रमक भूमिका

कंत्राटदार कामाचा दर्जा दाखवत नसतील तर आम्हाला शेवटी मनसे स्टाईलने उत्तर द्यावे लागेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी कंत्राटदाराला दिला आहे. कल्याण डोंबिवली मध्ये बांधण्यात आलेल्या निष्कृष्ट दर्जाच्या रस्ते बांधकामावर त्यांनी ताशोरे ओढले आहे.

मागच्या काही दिवसांपासून कल्याण-शीळ रोड हा ६ पदरी करून यावर कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. हे काम युद्धपातळीवर चालू असून कल्याण फाटा ते पालवा पर्यंत जवळपास ८०% काम पूर्ण झाले आहे. तर पुढील रस्त्यावर सुद्धा कॉंक्रीटीकरण करण्यात येत आहे. मात्र हे काम चांगल्या दर्जाचे केले जात आहे का असा प्रश्न मनसेआमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

कारण बांधण्यात आलेल्या नव्या काँक्रीटीकरण रस्त्याला आताच खड्डे पडलेला सुरवात झालेली आहे. तर काही ठिकाणी क्रॅक सुद्धा गेलेले दिसून येत आहे. याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसीकडे पत्र सुद्धा दिले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे आता दिसून येत आहे. त्यामुळे मनसेने आता आक्रमक पवित्रा घेतला असून कामाचा दर्जा दाखवत नसतील शेवटी मनसे स्टाईलने उत्तर द्यावे लागेल असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला.

error: Content is protected !!