ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

कर्नाटकच्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार, संजय राऊतांची केंद्रा सरकारवर घणाघाती टीका

कर्नाटक शहरातील रामलिंग खिंड येथील रस्त्यावर शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला कन्नड संघटनांनी काळे फासण्याचा प्रयत्न काल केला होता. या झालेल्या घटनेमुळे कन्नड भाषिक संघटनेच्या विरोधात महाराष्ट्रात वातावरण चांगलेच तापले आहे यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकात असलेल्या भाजपा सरकारबरोबर केंद्रातील मोदी सरकारला इशारा दिला आहे.

बेळगावात मराठी लोकांवर मागच्या अनेक वर्षांपासून जो अन्याय-अत्याचार सुरु आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीने बेळगावात उतरावे लागेल. परिस्थिती हाताबाहेर गेली तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेनेनेला जबाबदार धरु नये. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिलेली आहे.

आज बेळगावात मराठी नागरिकांवर, शिवसेनेच्या कार्यालवर हल्ले होत आहे. त्यामुळे तेथील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे चित्रं पुन्हा एकदा दिसून आले आहे. या परिस्थितीला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे, असे म्हणत पश्चिम बंगालमधील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

error: Content is protected !!