ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

अवकाळी आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या झालेल्या नुकसानीचा खासदार रक्षाताई खडसे यांनी समक्ष पाहणी करून आढावा घेतला

अवकाळी आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या झालेल्या नुकसानीचा खासदार रक्षाताई खडसे यांनी समक्ष पाहणी करून आढावा घेतला
उमेश कोळी जिल्हा प्रतिनिधी

एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाववाढत असून दुसरीकडे निर्गाचेही कालचक्र बिघडलेले आहे. यात अडचणीच्या कात्रीत सापडला आहे तो शेतकरी. दोन दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचा मका आणि केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही घरांचेही नुकसान झालेले आहे. या अवकाळी आलेल्या वादळामुळे शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या झालेल्या नुकसानीची कोथळी येथील मानेगाव शिवारात भाजपा खासदार रक्षाताई खडसे व मुंढे तलाठी माणेगाव शिवार तहसीलदार संचेती मॅडम मुक्ताईनगर यांनी समक्ष पाहणी करून आढावा घेतला.

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत संरक्षण देण्याची व्यवस्था अंमलात आणणे आवश्यक आहे. झालेलं नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे राज्यसरकारने व केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानाची प्राधान्याने दाखल घेणे आवश्यक आहे. अवकाळी आलेल्या पावसामुळे माधव भास्कर पाटील यांचे घर पडलं. तसेच घरांचेही नुकसान झालेले आहे. समक्ष खासदार रक्षाताई खडसे पाहणी करण्यासाठी आल्यामुळे शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानी बाबत आक्रोश व्यक्त करून मदतीची हाक दिली. खासदारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देऊन मदतीचे आश्वासन दिले. यावेळी देवीदास चौधरी, शंकर चौधरी, रामदास चौधरी, पंकज चौधरी, भानुदास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य उमेश राणे, अमित चौधरी, योगेश चौधरी, योगेश पाटील, मीराबाई पाटील, विजय चौधरी सर, चंद्रकांत चौधरी, श्रीकृष्ण चौधरी, अविनाश चौधरी, माधव भास्कर पाटील आदींसह नुकसानग्रस्त शेतकरी व सामान्य जनता आपली व्यथा मांडण्यासाठी जमले होते.

error: Content is protected !!