ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

मुंबई मनपा पालिकेने दिली मुंबईकरांना साद, “आम्ही हे तुमच्या मदतीशिवाय करू शकत नाही”

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई मनपाच्या अडचणीत अधिक वाढ झालेली दिसून येत आहे. एकीकडे मुंबईत कोरोना लसीकरण युद्ध पातळीवर सुरु असताना दुसरीकडे वाढत असलेली रुग्णसंख्या मनपा प्रशासनाच्या अडचणी अधिक वाढवताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगर पालिकेने थेट मुंबईकरांना साद घातली आहे. करोनाचा प्रसार रोखणं हे मुंबईकरांच्या सहकाऱ्याशिवाय शक्य नाही, असे पालिकेने आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवर टाकलेल्या संदेशात म्हटले आहे.तसेच मागच्या जानेवारी महिन्यांपासून वाढत असलेली आकडेवारी सुद्धा या ट्विटर अकाऊंटवरून देण्यात येत आहे.

“२०२१ची सुरुवात आरोग्यदायी संदेशाने झाली होती. ११ जानेवारीला मुंबईत फक्त २३९ नव्या रुग्णांची भर पडली. पण पुढच्याच महिन्यात ११ फेब्रुवारीला ६२४ नवे रुग्ण वाढले तर आता ११ मार्चला तब्बल १५०८ नवे करोना रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. हा आलेख कोणत्या दिशेने जाईल, हे ठरवणं आपल्या हातात आहे. या व्हायरसला मुंबईवर मात करू देऊ नका. मुंबई, तुमच्याशिवाय आम्ही हे करू शकणार नाही”, अशा आशयाचा संदेश या ट्वीटमध्ये दिला आहे.

error: Content is protected !!