ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

मराठा आरक्षण मुद्दयावरून चंद्रकांत पाटलांनी लगावला राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांना टोला

राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापताना दिसत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सरळ सरकारकडे विष पिण्याची परवानगी मागितली होती. आता त्या पाठोपाठ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडीत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यावर आरक्षण संदर्भात गंभीर आरोप लावले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांनी महाराष्ट्रात मराठा समाजाच्या नावाने अनेक वर्षे राजकारण केले. मात्र हा मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार नाही याची खबरदारी त्यांनी आजपर्यंत घेतली होती असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर लगावला होता.

या संदर्भात त्यांनी ट्विट करून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. तुम्हा प्रस्थापितांना गरीब मराठ्यांना कधी आरक्षण द्यायचेच नव्हते. १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र, तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती. मराठ्यांची नाही. मराठा समाजाची मते हक्काने घ्यायची, पण त्यांना आहे तसेच राहू द्यायचे हेच तुमचे धोरण, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!