ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

…पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता, मराठी भाषेत स्टेटस ठेवला म्हणून तिघांना अटक

कोल्हापूर-कर्नाटक सीमाभागात वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. बेळगावातील तीन मुलांनी मराठी स्टेटस ठेवला म्हणून त्यांना ग्रामीण पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे. या कानडी सरकारच्या हिटलरशाहीवर आता सर्व स्थरातून टीका होतं आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मागील काही दिवसांपासून मराठी आणि कानडी भाषिक संघटनांमध्ये संघर्षाच्या घटना अधिक घडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता बेळगावात तीन मराठी तरुणांना अटक करण्यात आली आहे. निखिल केसरकर, विशाल छप्रे आणि दिगंबर डेळेकर अशी अटक करण्यात आलेल्या मराठी तरुणांची नावे आहेत.

सदर प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार या तिन्ही मुलांनी मराठी भाषेचे स्टेटस आपल्या मोबाईलवर ठेवले होते. फक्त मराठी स्टेटस का ठेवले या प्रकरणातून या तिन्ही मुलांना अटक करण्यात आलेली आहे.

दोन दिवसांपूर्वी कन्नड वेदिका संघटनेने मराठी पाट्यांना काळे फासण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी कन्नड पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती असा आरोप स्थानी मराठी जनतेकडून लावला जात होता. मात्र फक्त मराठी स्टेटस ठेवल्यामुळे करण्यात आलेल्या कारवाईवर आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

error: Content is protected !!