ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

मनसे अध्यक्ष राज ठकरे यांच्या हस्ते सदस्य नोंदणीला सुरवात

पुणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोबिंवली तसंच मिरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर कसली आहे. तसेच मुंबई मनपात सत्तेत बसलेल्या शिवसेनेला जोरदार टक्कर देण्यासाठी मनसेने आतापासूनच सुरवात केली आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून मनसे महानगर पालिकेत सुरु असलेल्या गोंधळ कारभारावर सडकून टीका करत आहे.

त्यात येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पासून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरवात होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरवात होणार आहे. आज सकाळी १० वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी स्वतःची सदस्य नोंदणी करणार आहेत.

तसेच मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर सदस्य नोंदणीसाठी वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीचा मजकूर काल रात्री व्हॉटस् अप करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त सदस्य नोंदणीचे मनसेचे लक्ष्य आहे.

error: Content is protected !!