ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

आघाडीसाठी हे शुभ संकेत नाहीत, आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊतांनी केले भाष्य

मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाई नंतर राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते.त्यात हिरेन प्रकरणी विरोधी पक्षाने दाखवलेलं अनावश्यक स्वारस्य व मुंबई पोलिसांवर केलेल्या आरोपांबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली होती,

तसेच संजय राऊत यांनी सत्तेत असलेल्या आघाडी सरकारलाही इशारा दिला. ‘हिरेन प्रकरणातील गुप्त माहिती सगळ्यात आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मिळणं हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

आजच्या सामना अग्रलेखातून राऊत यांनी हिरेन प्रकरणावर भाष्य केले आहे.आठ दिवसांच्या अधिवेशनात संपूर्ण ‘फोकस’ त्यांच्यावर राहिला, अशा शब्दांत राऊत यांनी फडणवीसांचे कौतुक केले आहे. मात्र, त्याचवेळी विरोधी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले.

‘मुंबई पोलिसांच्या तपासावर राज्याचे विरोधी पक्षनेते आक्षेप घेतात. पोलिसांचे मनोधैर्यच नष्ट करतात. हा राज्यव्यवस्थेवर दबाव आणण्याचाच प्रयत्न असतो. या दबावातूनच पोलीस व प्रशासन विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवत असतात. हे असे घडणे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत अशी भीती राऊत यांनी सामना अग्रलेखातून व्यक्त केली होती.

तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चोवीस तासांत ‘एनआयए’ला केंद्राने घुसवले ते कशासाठी? केंद्रात भाजपचे सरकार असल्यानेच हे घडू शकले! महाराष्ट्रासारख्या राज्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्याचाच हा प्रकार आहे,’ असा आरोपही राऊत यांनी केला आहे.

error: Content is protected !!