ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

प्रभाग क्रमांक ८ मध्ये नगरसेविका विद्याताई वाव्हळ यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम.

प्रभाग क्रमांक ८ मध्ये नगरसेविका विद्याताई वाव्हळ यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम.

🔸अशोक काळकुटे | संपादक

महिलांसह, लहान मुले व युवकांनी केले श्रमदान.

▪️धनराज पवार | जामखेड.
– स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेतून महाराष्ट्र मध्ये एक नंबर आणायचा आहे यासाठी आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार यांच्या माध्यमातून जामखेड नगरपरिषदेच्या नगरसेविका विद्याताई वाव्हळ यांनी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे तसेच शहरातील मिलिंद नगर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरामध्ये आज रोजी सकाळी 7 ते 9 या परिसरामध्ये नगरसेविका , महिला लहान मुले तसेच युवकांनी हाती घेतलेली मोहीम ही श्रमदानाच्या माध्यमातून परिसर स्वच्छ करण्यात आले.

यावेळी बोलताना नगरसेविका विद्याताई वाव्हळ म्हणाल्या कार्यसम्राट आमदार रोहित पवार तसेच त्यांच्या मातोश्री सौ सुनंदाताई पवार यांच्या माध्यमातून सध्या कर्जत-जामखेड मतदारसंघांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण हे चांगल्या पद्धतीने चालू आहे तसेच या मोहिमेत शहरातील महिला, युवक, वयोवृद्ध, लहान मुले यांनी ही मोहीम हाती घेऊन या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेत कर्जत जामखेड महाराष्ट्र मध्ये एक नंबर येईल तसेच शहराची स्वच्छता हे नागरिकांच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे या माध्यमातून कार्यसम्राट आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री यांच्या स्वप्नांना आम्ही सर्व एकत्र येऊन साथ देऊ.

यावेळी नगरसेविका विद्याताई वाव्हळ, माजी ग्रामपंचायत सदस्य शकुंतला मगर, राजेश वाव्हळ, बाबासाहेब मगर, कुंडल राळेभात, संतोष नवलाखा, मनोज कार्ले, महाडिक दादा, बाबासाहेब काळे,दत्ता चर्‍हाटे, युवा नेते समीर चंदन तसेच प्रभागातील महिला मीरा महाडिक, कविता कार्ले, संगीता तोडमल, मीरा घायतडक, रंजना सांगळे, रूपाली आडाले, प्रतिभा जोरे ,वेदपाठक ताई, कुसुम रिठे लहान मुले नेहा कुणाल व नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!