ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

रविवार असल्याने कोणतीही नाकारात्म माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती पण….. – चंद्रकांत पाटील

मुंबई : आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती” असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला आहे. मार्च महिन्यापासून ते आता पर्यंत महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या हवाला देत ठाकरे सरकारसह राज्याच्या गृहमंत्र्यांना पाटलांनी टोला लगावला आहे.

 

आज रविवार. आज आपल्या सर्वांसह कोणत्याही प्रकारची नकारात्मक माहिती शेअर करण्याची इच्छा नव्हती. पण जेव्हा राज्यात सुरु असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाचल्या तेव्हा १०-१२ दिवसांपूर्वी घडलेल्या महिला अत्याचार आणि पूजा चव्हाणसारख्या घटना स्मरणात आल्या. ठाकरे सरकार यावर कधी गांभीर्याने लक्ष देणार? या सर्व गोष्टींची सरकार गंभीर दखल कधी घेणार? झोपेचं सोंग घेतलेल्या या सरकारला जाग कधी येणार? असा टोला लगावला आहे

२ मार्च- जम्बो कोविड सेंटरमध्ये वॉर्डबॉयकडून महिलेचा विनयभंग.
३ मार्च- औरंगाबादमध्ये करोनाबाधित महिलेवर डॉक्टरकडून अतिप्रसंगाचा प्रयत्न.
४ मार्च – जळगावमध्ये पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नाचवलं.
६ मार्च – शिक्षिकेचा विनयभंग करून तिला धमकी देण्यात आली.
७ मार्च -पैशांसाठी विवाहितेचा छळ.
८ मार्च – महाबळेश्वर येथे अल्पवयीन मुलीवर शिक्षकानेच बलात्कार केला.
११ मार्च – ७ महिन्यांच्या बाळासह महिलेची गळफास लावून आत्महत्या.
१२ मार्च -पित्याकडून मुलीवर अत्याचार.
राज्यातील या घटनांचा उल्लेक करत “हे कधीपर्यंत असंच चालणार?” असा सवाल पाटील यांनी राज्य सरकारकडे केला आहे.

error: Content is protected !!