ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

नवऱ्याने लावले सार्वजनिक ठिकाणी बायकोचे पोस्टर ; कोणाला गरज पडली तर…

नवऱ्याने लावले सार्वजनिक ठिकाणी बायकोचे पोस्टर ; कोणाला गरज पडली तर…

🔸अशोक काळकुटे | संपादक

बुलडाणा- संताप आणि विकृती माणसाला किती खालच्या पातळीवर नेऊ शकते, याचे धक्कादायक उदाहरण चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे घडलं आहे. पत्नी घटस्फोट देत नसल्याने एका विकृत नवऱ्याने सार्वजनिक ठिकाणी तिचे पोस्टर्स लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुलडाण्यातील चिखली तालुक्यात ही घटना घडली आहे. समाधान निकाळजे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरणं ?
एक वर्षापुर्वी ३० जून रोजी समाधान याचा विवाह अंचरवाडी येथील एका मुलीशी झाला. पण तो त्याच्या पत्नीवर सतत संशय घेत होता. त्यावरुन तो बायकोला सतत शाररिक आणि मानसिक त्रास देत होता. त्यामुळे त्याची पत्नी दिवाळीच्या दरम्यान माहेरी निघून गेली. त्यानंतर समाधान निकाळजेने घटस्फोट मिळावा, यासाठी स्वतःच्या बायकोचे फोटोचे पोस्टर बनवून सार्वजनिक ठिकाणी लावले. आणि या पोस्टर्सवर “गरज पडल्यास संपर्क साधा” असे लिहिले आहे. त्यावर काही मोबाईल नंबरही दिले आहेत. याबद्दल विवाहितेच्या भावाने त्याला जाब विचारला. जोपर्यंत घटस्फोट मिळत नाही तोपर्यंत एसटी, बस ,रेल्वे स्टेशन, सगळीकडे फोटो लावून बदनामी करेन, अशी धमकी देखील त्याने दिली आहे.

विशेष म्हणजे या विकृत व्यक्तीने जर घटस्फोट दिला नाही, तर पत्नीच्या बहिणीचे आणि सासूचे ही पोस्टर्स लावून त्यांची बदनामी करेन, अशी धमकी त्याने दिली आहे.

आरोपीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल.

तक्रारीत समाधान निकाळजे असे आरोपीचे नाव आहे. त्यामुळे महिलेच्या भावाच्या तक्रारीवरुन अंढेरा पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हे प्रकरण गंभीर असल्याने अंढेरा पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशाप्रकारे पत्नीचे पोस्टर लावून त्याखाली नंबर लिहिणे चुकीचे आहे, असेही काहींचे म्हणणं आहे.

error: Content is protected !!