ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

डॉ.बिराजदार यांची लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ़ द ईयर पुरस्कार साठी निवड

डॉ.बिराजदार यांची लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ़ द ईयर पुरस्कार साठी निवड
अंबाजोगाई(अभिजीत लोमटे,शहर प्रतिनिधी)- महाराष्ट्रात आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या कोराडी या छोट्याशा गावातुन आलेल्या डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी आज पर्यंतच्या वैद्यकीय क्षेत्रात जी अलौकिक कामगिरी केली आहे, ती अनेकांना पटत नसली तरी ती प्रशंसनीयच आहे. यांचा वारंवार अनुभव येतो. आज महाराष्ट्रातील प्रतिथयश आणि अग्रगण्य दैनिक असलेल्या “दैनिक लोकमत” च्या वतीने देण्यात येणा-या “लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर” या अत्यंत सन्मानाच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड करुन त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील सेवेवर ठसठशीत मोहर उमटवली आहे.
येत्या १६ मार्च रोजी सदरील पुरस्कार दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, लोकमत परीवारातील ज्येष्ठ सदस्य मा. खा. विजयबाबु दर्डा, माजी मंत्री राजेंद्रजी दर्डा, ऋषी दर्डा व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील पदवीचे शिक्षण घेवून डॉ. सिध्देश्वर बिराजदार हे मेडिसीन विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अंबाजोगाईत येतात काय, आणि अंबाजोगाईचेच होवून जातात काय, हा विलक्षण योगायोग आहे. अत्यंत योग्य, तज्ज्ञ आणि कडक शिस्तींच्या प्रोफेसरांच्या हाताखाली डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतरच्या सर्व घटनांचे आणि प्रसंगाचे साक्षीदार अंबाजोगाईकर आहेत. वैद्यकीय सेवा करीत असतांनाच रुग्णांच्या मनात आणि घरातील प्रत्येक सदस्यांच्या मनात अलगद उतरणारा शासकीय सेवेतील हा एकमेव अव्दितीय डॉक्टर असावा!
२०२० हे वर्षे या शतकातील वैद्यकीय क्षेत्रातील सेवेला आव्हान देणारे वर्ष ठरले. कोवीड सारख्या नव्या संसर्गजन्य विषाणुने वैद्यकीय सेवेचेच नव्हे तर प्रत्येकाच्या जगण्याचे ही संदर्भ बदलले. मृत्युने थैमान घातलेल्या या काळात कोवीड विरुद्ध लढा देण्यासाठी पाय रोवून उभा टाकला तो डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचारीच! याच काळात लोकांना कोवीड १९ चा प्रादुर्भाव असलेल्या रुग्णांना या नव्या जिवाणूंच्या उपचारांचा आणि शासनाकडून नवनवीन मिळणा-या गाईडलाइनचा अभ्यास करीत हजारो रुग्णांना कोवीड मुक्त करण्याचे काम डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांच्या नेतृत्वाखालील टीम ने केले. एवढेच नाही तर स्वत: कोवीड पॉझिटिव्ह निघालेले असतांना व उपचारासाठी स्वारातीच्या रुग्णालयात दाखल असतांनाही कोवीड रुग्ण सेवेला प्राधान्य देण्याचे काम डॉ. बिराजदार यांनी केले.
डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी आज पर्यंत केलेल्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेवून दैनिक लोकमत ने ” लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर” या सन्मानाच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!