ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

बँक कर्मचारी आज पासून जाणार दोन दिवसांच्या संपावर

मुंबई : खाजगी बँकाच्या संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात बँक कर्मचारी सोमवारपासून दोन दिवसांच्या संपावर जाणार आहे. या संपात १२ बँका, खासगी, सहा विदेशी, ५६ प्रादेशिक ग्रामीण बँकेतील दहा लाखांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होणार आहे.

सदर या बँका १५० लाख कोटी रुपयांचा म्हणजे एकूण बँकिंग व्यवसायाच्या ७० टक्के व्यवसाय हाताळतात. या बँक संपाच्या निर्णयामुळे मात्र नागरिकांचे प्रचंड हाल होणार आहे तसेच याचा संपूर्ण भार एटीएमवर येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निदर्शने, धरणे, मेळावे असे कार्यक्रम एकत्र येऊन शक्य नसल्यामुळे बँक कर्मचारी तसेच अधिकारी आपल्या ग्राहकांना घरोघरी तसेच व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन भेटत आहेत. याखेरीज ते आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटत आहेत.

बँक युनियनचे निमंत्रक देविदास तुळजापूरकर म्हणाले,की या संपात राज्यातील दहा हजार पेक्षा जास्त शाखेतून काम करणारे अंदाजे पन्नास हजार बँक कर्मचारी तसेच अधिकारी सहभागी होत आहेत. संपाची सुरुवात सकाळी सहा वाजल्यापासून सेवा शाखा ज्या चेक क्लिअरिंगचे काम पाहतात तेथून होईल.

error: Content is protected !!