ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

धक्कादायक! विजेच्या ट्रांसफार्मर ला चिटकुन तरूणाचा मृत्यू.

धक्कादायक! विजेच्या ट्रांसफार्मर ला चिटकुन तरूणाचा मृत्यू.

🔸अशोक काळकुटे | संपादक

बीड तालुक्यातील खजाना विहीरी पासुन अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या ट्रांसफार्मरमध्ये आज सकाळी ०९:०० वाजता फ्युज टाकत असताना आहेर वडगाव येथील १८ वर्षीय तरूण गणेश सुनील तावरे याचा चिटकुन जागीच मृत्यू झाला आहे.
यामध्ये तरूणाचे शरीर अंदाजे ७० ते ८० टक्के इतके भाजले असून घटनास्थळाच्या आसपासचा बराच परिसर जळुन खाक झाला आहे. त्याच्या पश्चात आई,वडील आणि १ बहिण आहे.
घटनास्थळावर नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. घटना अतिशय हृदयद्रावक असुन घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते तर प्रत्येकजण हळहळ व्यक्त करत आहे.
दोन तासानंतर देखील घटनास्थळी पोलिस किंवा महावितरणचे कोणीही कर्मचारी पोहचलेले नव्हते. यामुळे जमावाकडुन नाराजी व्यक्त केली जात होती.

महावितरणचे कर्मचारी वेळेवर पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांचे जात आहेत जिव.

कुठल्याही प्रकारची अडचण आल्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फोन करून देखील तासं-तास कर्मचारी येत नसल्याने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून स्वतःच दुरुस्तीचे कामे करावी लागतात. त्यामुळे अनेकांचे विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झालेले आहेत.

महावितरण कंपनी जसी वसुली करते तशी सुरक्षीतता द्यावी.

महावितरणच्या गलथान कारभारामुळे यापूर्वी देखील विजेच्या धक्क्याने अनेकांचे मृत्यू झाले आहेत‌. गेल्या काही दिवसांपूर्वीच बीड तालुक्यातील नांदूर फाटा या ठिकाणी देखील एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा अवघ्या आठ दिवसांच्या आतच पुन्हा एका तरूणाचा मृत्यू झाल्याने ज्या पद्धतीने महावितरणने वसुलीसाठी वेगात काम सुरू केले आहे. त्या पद्धतीनेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काम करण्याची आज गरज आहे.

error: Content is protected !!