ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास NIA कडे जाण्याची शक्यता, ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची NIA कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली होती आता त्या पाठोपाठ या संपूर्ण प्रकरणात प्रकाशझोतात आलेले मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास सुद्धा लवकरचं NIA कडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या NIA केवळ अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास करत आहे. तर ATS पथक मनसुख हिरेन हत्याप्रकरण आणि स्कॉर्पिओ गाडीच्या चोरी प्रकरणाचा तपास करत आहे मात्र आता लवकरच हिरेन प्रकरणाचा तपास NIA आपल्या हातात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सचिन वाझे यांना अटक झाल्यापासून NIA च्या तपासाने वेग घेतला आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. या तिन्ही प्रकरणांच्या केंद्रस्थानी सचिन वाझे हेच आहेत. त्यामुळे या तिन्ही प्रकरणांचा एकत्रित तपास एनआयएकडे सोपवण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

error: Content is protected !!