ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

ठाकरे सरकारने दिलेला शब्द पाळला, सेविकेच्या कुटुंबियांना दिली ५० लाखाची मदत

कोरोना विरोधात लढाईला अंगणवाडी सेविकांनी आपले कर्त्यव्य बजावत प्राणाची बाजी लावून वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सेवा बजावली होती. या कोरोना लढाईला सेवा बजावताना शाहिद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली होती.

आपल्या प्राणांची बाजी लावून गत एक वर्षांपासून सेविका कार्यरत आहेत. याच लढाईत शहीद झालेल्या उषाताई पुंड यांचे देशासाठी व समाजासाठीचे योगदान अमूल्य आहे. शासन करोना लढवय्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

कोविड योद्धा रामा येथील दिवंगत अंगणवाडी सेविका उषाताई पुंड यांच्या कुटूंबियांना शासनातर्फे ५० लाख रुपयांची मदत पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाद्वारे देण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी पालकमंत्री यांनी दिवंगत उषाताई पुंड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी पुंड कुटुंबाचे सांत्वन करून त्यांना दिलासा दिला.

पालकमंत्री म्हणाल्या की, आशा व अंगणवाडी सेविकांनी कोरोना काळात मोलाचे योगदान दिले व देतही आहेत. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पुंड यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. मी स्वतःही एक कुटुंबीय म्हणून या सर्वांसोबत राहीन.

error: Content is protected !!