ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज 15 मार्च वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलिया तिच्या चाहत्यांसह एक मोठे सरप्राईज शेअर करणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज 15 मार्च वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आलिया तिच्या चाहत्यांसह एक मोठे सरप्राईज शेअर करणार आहे. मात्र, या सरप्राईज आधी आलियाने त्याची एक झलक तिच्या चाहत्यांसमवेत शेअर केली आहे. आम्ही ‘आरआरआर’ चित्रपटातील आलिया भट्टच्या फर्स्ट लूकबद्दल बोलत आहोत. काही दिवसांपूर्वी अशी घोषणा करण्यात आली होती की, 15 मार्च रोजी म्हणजेच आलिया भट्ट हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘आरआरआर’ मध्ये ती साकारात असलेली सीतेची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आणली जाईल

अभिनेत्री आलिया भट्ट एसएस राजामौलीच्या चित्रपटाद्वारे तेलुगूमध्ये पदार्पण करत आहे, ज्याबद्दल ती आणि तिचे चाहते खूपच उत्साही आहेत. तिच्या वाढदिवसाच्या आधी, 14 मार्चच्या रात्री आलियाने तिच्या इंस्टाग्रामद्वारे तिच्या ‘आरआरआर’च्या तिच्या लूकची झलक दाखवली आहे. यात आपण पाहू शकता की, आलिया काळ्या रंगाची छटा असलेल्या ठिकाणी बसली आहे. ही जागा एका मंदिरासारखी दिसते, कारण आलिया एका मूर्तीसमोर बसली आहे, जी माता सीतेची मूर्ती आहे. हा फोटो शेअर करताना आलिया म्हणाली की, तिचा संपूर्ण लूक उद्या म्हणजेच सोमवारी प्रदर्शित होईल.

पाहा आलियाचा लूक

एस. एस. राजामौलीच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने मोठा पडदा चांगलाच गाजवला होता. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. यानंतर आता या चित्रपटाच्या माध्यमातून तेलगू चित्रपटसृष्टीतील दोन सुपरस्टार्स अर्थात ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेता राम चरण या पीरियड ड्रामामध्ये प्रथमच एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. या चित्रपटाच्या घोषणेनंतर हा चित्रपट चांगला चर्चेत आला आहे. दक्षिण भारतीय चित्रपटांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत
चित्रपटाचे हक्क विक्रीला
‘आरआरआर’ हा चित्रपट 10 भाषांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यानंतर केवळ 5 भाषांमध्ये थिएट्रिकल राइट्ससाठी आतापर्यंत 348 कोटीहून अधिकच्या ऑफर आल्या आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेनंतर चाहते या चित्रपटाविषयी खूप उत्सुक झाले आहेत. आरआरआरला तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमच्या थिएट्रिकल राइट्ससाठी एकूण 348 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे

चांगला गल्ला जमवणार!
खास गोष्ट म्हणजे ‘बाहुबली 2’च्या रिलीजपूर्वी या आकड्याला मागे टाकले आहे, ज्याने दक्षिण-भाषिक राज्यांमधून सुमारे 215 कोटी रुपये कमावले होते. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट आहे की रिलीज झाल्यानंतर ‘आरआरआर’ चांगलाच गल्ला जमवणार आहे. ज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, समुथिरकानी आणि अ‍ॅलिसन डूडी यांच्यासह अनेक भारतीय प्रसिद्ध कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. हा सर्वात मोठा हिट भारतीय चित्रपट ठरणार आहे.

error: Content is protected !!