ब्रेकिंग न्युज
नर्सिंगच्या नवीन अभ्यासक्रमामुळे संधी वाढल्याकुणबी प्रमाणपत्र न मिळाल्याने पालवण येथील मराठा तरुणाची आत्महत्या ..!बिंदुसरा नदीपात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका ; मान्सुनपुर्व साफसफाईची जिल्हाधिका-यांना मागणी   :- डॉ.गणेश ढवळेआळंदी मंदिरात मोहिनी एकादशी साजरी मंदिरात लक्षवेधी पुष्पसजावट; दर्शनास गर्दीसांगली येथे १० दिवशीय आर.एस.पी. प्रशिक्षण शिबीर संपन्नश्री शंभुसुर्य मर्दानी खेळ व मल्लखांब प्रशिक्षण संस्था जामखेड आयोजित भव्य शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न….लोकसभेच्या निवडणुकी मुळे महाराष्ट्रातील बीजेपीचे त्रिमूर्ती सरकार दुष्काळ हाताळण्यात अपयशी – वसंत मुंडे बलात्कार केल्याच्या आरोपातून आरोपीला जामीन मंजूरगटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे : जामखेड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे जामखेडचे भूमिपुत्रपंकजाताई मुंडे यांचा नाशिक मतदारसंघात झंझावात ;  डाॅ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सोनगावात जोरदार सभा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची एनआयए’कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना एनआयए’कडून अटक करण्यात आली तसेच त्यांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. या सर्व घडामोडीमध्ये ठाकरे सरकारवर मोठे संकट उभे थाटले आहे.

त्यात आता एकीकडे वाझे प्रकरणात मोठे खुलासे होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी १२:०० वाजता पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर लगेच दुपारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून प्रथमच सरकारसमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. सुरुवातीला राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, त्यानंतर संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते या सर्व प्रकरणात अंबानी यांच्या घराबाहेर मिळलेली स्फोटके आणि या प्रकरणात शिवसेनेचे जवळचे असलेले वाझे यांचे नाव आल्यामुळे आघाडीच्या अडचणी अधिक वाढल्या होत्या.

त्यात भाजपाचं लक्ष्य शिवसेना असली तरी गृहखाते राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याकडं असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसही सावध झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज शरद पवारांनी बैठक बोलावली आहे. राज्य सरकारच्या कारभारात केंद्राचा हस्तक्षेप सातत्यानं वाढत असल्याचा राज्य सरकारचा सुरुवातीपासूनच आरोप आहे.

error: Content is protected !!