ब्रेकिंग न्युज
बारावी सायन्स नंतर डी फार्मसी का करावे?अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त व माता रमाईच्या स्मृती दिनानिमित्त बामसेफचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिरसौ.के.एस.के. महाविद्यालय दिनांक 27 व 28 मे 2024 रोजी  होणार्‍या नॅकसाठी सज्जधारूर येथील कब्रस्तान ची जागा कागदोपत्री चुकीची माहिती नोंदवून अकृषी करून घेतलीआमदार रोहित पवार यांनी पै.दादासाहेब (हवा शेठ) सरनोबत यांची भेट घेवून केलं सांत्वन…महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व गेवराई पत्रकार संघ गेवराई ची कार्यकारणी जाहीरनाथपंथी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द -डॉ.योगेश क्षीरसागरगोरबंजारा धर्मपीठ हामुगड अथणी-कर्नाटक येथे २६ व २७ मे रोजी राष्ट्रव्यापी बंजारा संमेलनाचे आयोजनमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करा- सकल मराठा समाजकुणबी प्रमाणपत्राला वेळ मागील दोन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांकडुन वारंवार मागणी करूनही स्वाक्षरी मिळत नाही…..

सचिन वाझे प्रकरणात आमदार नितेश राणे यांनी लगावले वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची एनआयए’कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना एनआयए’कडून अटक करण्यात आली होती आता त्या पाठोपाठ या संपूर्ण प्रकरणावर पत्रकार परिषद घेऊन भाजपा आमदार नितेश राणे यांनी भाष्य केले आहे.

यावेळी त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे पत्रकार परिषदेत केले होते. कोरोनाच्या संकट मार्च-एप्रिलमध्ये खेळली जाणारी IPL मॅच नोव्हेंबर मध्ये खेळण्यात आली होती. या मॅचवर सट्टा लावणाऱ्या सर्व बुकींना सचिन वाझे यांनी १५० कोटीची खंडणी मागितल्याचा खळबळजनक आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसेच वाझे यांना फोन करून त्यातील टक्केवारी वरुण सरदेसाई यांनी मागितल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.

वरुण सरदेसाई हे शिवसेना प्रणित युवासेना सचिव असून मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहे. या प्रकरणात निलेश राणे यांनी वरुण सरदेसाई यांचे नाव घेऊन सरळ-सरळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले आहे. तसेच कुणाच्या सांगण्यावरुन वरुन सरदेसाई यांनी फोन केले? वरुन सरदेसाई कुणाचे नातेवाईक आहे? वरुन सरदेसाईंवर कुणाचा आशीर्वाद आहे? हे एनआयने तपासावे , असे नितेश राणे यांनी सांगितले आहे. वरुण सरदेसाई यांची कॉल रेकॉर्ड जोपर्यंत तपासले जात नाहीत तोवर वाझेंच्या मागचा मास्टरमाईंड समोर येणार नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!