ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

ग्राहकांना घरबसल्या मिळवता येणार न्याय

              कार्यकारी संपादक- महेंद्र लोहोट
बारामती:ग्राहक संरक्षण मंडळाच्या नवीन तरतुदीमुळे देशातील ग्राहकांना घरबसल्या न्याय मिळवता येणार आहे. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हा २०जुलै २०२०रोजी देशामध्ये लागू करण्यात आला.या कायद्यामध्ये ग्राहकांचे हक्काचे संरक्षण अधिक होणार आहे.
ग्राहकांची फसवणूक झाली सदोष वस्तू विक्री केली ऑनलाइन मागितलेली वस्तू खराब मिळाली,छापील किंमतीपेक्षा अधिक रक्कम आकारली अशा अनेक दैनंदिन समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते.यातून त्यांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास होतो.परंतु यापुढे ग्राहकांना असा त्रास होणार नाही.अशा तरतुदी ग्राहक संरक्षण कायदा२०१९ मध्ये करण्यात आल्या आहेत.त्यातून जर समस्या निर्माण झाली तर ग्राहकांना न्याय मागण्यासाठी न्यायालयात आयोगात जाण्याची गरज नाही.ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या पुढाकाराने ग्राहकांसाठी eddakhil.nic.in सोया उपलब्ध करुन देण्यात आली आहे.याच्या माध्यमातून सामान्य नागरिक ग्राहक देशातील कोणत्याही ग्राहक न्यायालयामध्ये आयोगामध्ये घरबसल्या आठवड्याच्या सातही दिवस २४ तास तक्रार दाखल करू शकतो.
आता फक्त ग्राहकांनी जागृत होऊन आपली तक्रार नोंदवली पाहिजे.उदा.ग्राहकाला कॅरिबागचे शुल्क आकारले मॉलला १५००० दंड झाला.कोणत्याही प्रकारच्या ग्राहकांच्या तक्रारी १८००-११-४०००या टोल फ्री क्रमांकावर नोंदवू शकता.असे राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे यांनी सांगितले.

error: Content is protected !!