ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

राष्ट्र्वादीत मोठी खलबत या बड्या नेत्याचं मंत्रीपद जाणार ?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची NIA कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना एनआयए’कडून अटक करण्यात आली होती. मात्र या सर्व घडामोडीत महाविकास आघाडीच्या अडचणी अधिक वाढल्या होत्या.

त्यात आता राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख मंत्र्यांची बैठक आज दुपारी आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहे. मात्र या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिपदावरुन उचलबांगडी होणार असल्याचे बोलले जात आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरण, मनसुख हिरेन तसेच सचिन वाझे प्रकरण हाताळण्यात गृहमंत्री सपशेल फेल ठरले असल्याची टीका विरोधकांनी केली होती. याच मुद्द्यावरून विरोधकांनी आघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे देशमुख यांची जबाबदारी दुसऱ्या नेत्याकडे सोपवण्यात येणार आहे अशीं चर्चा होत आहे.

अनिल देशमुख यांच्याऐवजी एखाद्या खमक्या नेत्याकडे हे मंत्रिपद दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा आहे. या प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जयंत पाटील यांच्या नावांचा विचार सुरु असल्याची माहिती आहे. अर्थात अंतिम निर्णय स्वतः शरद पवारच घेणार आहेत, त्यामुळे ते कोणत्या नावाला पसंती देतात यावर साऱ्या घडामोडी अवलंबून आहेत.

error: Content is protected !!