ब्रेकिंग न्युज
लिंबागणेशचे माजी उपसरपंच अशोक जाधव यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधनचंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत 26 वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळासाहेबराव पाटील, पाडळी व स्व.विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसडगाव येथील दहावी ची यशस्वी निकालाची परंपराबीड झाले कचर्‍याचे शहर सांगा कशी नांदेल स्वच्छता नगरपालिका दखल घेईल काय?उष्माघाताने वानराचा मृत्यू …… गावकऱ्यांनी केले अंतिम संस्कार …..अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्या ; वीज पुरवठा सुरळीत कराग्रामीण भागात पाणी टंचाईच्या तिव्र झळा; जिल्हा प्रशासन वातानुकूलित कार्यालयात पाणीटंचाई आढावा बैठका घेऊन निर्धास्त :- डॉ.गणेश ढवळेआळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयाचे दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश-शाळेचा ९९.४६ टक्के निकालकुरुळीत मेगा फायनल हिंदकेसरी व ट्रॅक्टरचे ब्रिजेश धुमाळ व प्रदीप टिंगरे यांच्या बैलजोडीस मानप्रशासकाच्या निष्काळजीपणामुळे जामखेड शहरात घाणीचे साम्राज्य वाढले ; मोकाट जनावरामुळे जामखेडकर हैराण

पाकिस्तानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील पहिले पगडीधारी शिख

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील सत्ताधारी पक्ष ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’चे नेते गुरदीप सिंह यांनी शुक्रवारी 12 मार्च खासदार म्हणून शपथ घेतली. यासह ते पाकिस्तानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील पहिले पगडीधारी शिख ठरले. सिंह यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत खैबर पख्तूनख्वा या अल्पसंख्याकांसाठी राखीव जागेवर प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केलाय .

गुरमीत सिंह यांना या निवडणुकीत 145 पैकी 103 मतं मिळाली. दुसरीकडे त्यांचे विरोधी उमेदवार जमीयत उलेमा-ए इस्लामचे फजलुर नेते रणजीत सिंह यांना केवळ 25 मतं आणि अवामी नॅशनल पक्षाच्या आसिफ भट्टी यांना केवळ 12 मतं मिळाली. सिंह यांच्याशिवाय पाकिस्तानच्या संसदेत आणखी 47 खासदारांनी शुक्रवारी पदाची शपथ घेतली. सिंह पाकिस्तानमधील स्वात जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते पाकिस्तानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील पहिले पगडीधारी शिख ठरलेत.

अल्पसंख्यांक समुहाच्या भल्यासाठी काम करणार : गुरमीत सिंह

शपथ घेतल्यानंतर सिंह म्हणाले, “मला देशातील अल्पसंख्यांक समुहाच्या विकासासाठी काम करायचं आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचा प्रतिनिधी या नात्याने मला या समुहाची सेवा करण्याची संधी नक्की मिळेल.” याआधी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अल्पसंख्यांक उमेदवारांची 5 मतं नाकारण्यात आल्याची माहिती दिली होती. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी गुरमीत सिंह यांना 102 मतं मिळतील असा दावा केला होता. प्रत्यक्षात त्यांना एक अधिकचं मत मिळालं.

error: Content is protected !!