ब्रेकिंग न्युज
श्री.संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल सायली वीर सी.बी.एस.ई.दहावी बोर्डात शाळेतून प्रथम.जातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवाची उत्साहात सांगतासोयाबीन उगवण क्षमता तपासूनच पेरणी करा – गेवराई कृषी विभागाकडून आवाहन.अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; गावपुढारी बेफिकीर ; जबाबदार सरपंच ,ग्रामसेवकांवर कारवाई करा :- डॉ.गणेश ढवळेमाहिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने मुलींना स्वसंरक्षणाचे धडेथोरल्या पादुका मंदिरास भाविका कडून सव्वा लक्ष रूपयांची देणगीमराठा आरक्षणासाठी 32 वर्षांच्या तरुणाने गळफास घेऊन संपविले जीवनभाजपा व राष्ट्रवादीने वंचित मतदारांना मतदान करण्या पासून रोखले :-अशोक हिंगे यांचा आरोपघाटकोपरच्या दुर्घटनेतुन  बीड नगरपालिका बोध घेणार का??  न्यायालयाच्या आदेशाचा अवमान,शपथपत्राद्वारे दिशाभूल कि पुन्हा येरे माझ्या मागल्या :- डॉ.गणेश ढवळेसध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

भगवान हनुमानाने रावणाची लंका जाळली तसेच ही ‘मशाल’ काही लोकांचा अहंकार जाळेल – प्रतिक पाटील

 

मुंबई दि. ११ ऑक्टोबर – जशी भगवान हनुमानाने रावणाची लंका जाळली तसेच ही ‘मशाल’ काही लोकांचा अहंकार जाळेल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्रतिक जयंतराव पाटील यांनी विरोधकांना फटकारले आहे.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह शिवसेनेला मिळाल्यानंतर प्रतिक जयंतराव पाटील यांनी ट्वीट केले आहे.

शिवसेनेला मिळालेली ‘मशाल’ ही क्रांती आणि संघर्षाचे प्रतीक आहे असे सांगतानाच ३ नोव्हेंबरला होणारी अंधेरीची पोटनिवडणूक महाविकास आघाडी जिंकेलच पण त्यासोबत क्रांती घडवून देशाला नवीन दिशाही दाखवेल असा विश्वास प्रतिक पाटील यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!