ब्रेकिंग न्युज
घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी 

पंकजाताई मुंडेंच्या विजयासाठी परळीत महायुतीचे कार्यकर्ते सरसावले

पंकजाताई मुंडेंच्या विजयासाठी परळीत महायुतीचे कार्यकर्ते सरसावले

भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या प्रचारफेरीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परळी ।दिनांक १५।;-भाजपा महायुतीच्या बीड लोकसभा मतदार संघातील उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सरसावले आहेत. शहरात आज मोठ्या उत्साहात महायुतीमधील घटक पक्षांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचारफेरी काढून मतदारांशी थेट संपर्क साधून पंकजाताईंना विक्रमी मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन केले.

जिल्हयाचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वाजता संत जगमित्र नागा मंदिर येथुन प्रारंभ झालेल्या या प्रचार फेरीत महायुतीचे फलक व पंकजाताई यांच्या संकल्पनेतील बीड जिल्ह्याच्या विकासाचे मुद्दे मतदारांना पटवून देण्यात आले.या प्रचारफेरीचे मतदारांनी ठिकठिकाणी स्वागतही केले. पंकजाताई मुंडे यांच्या उमेदवारीची महायुतीकडुन घोषणा झाल्यानंतर होमपिच असलेल्या परळी शहरात उत्साहाचे वातावरण आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही दिवस अगोदरच परळी शहरातील भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना (शिंदे गट),रिपाइं आदी महायुतीमधील घटक पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी संत जगमित्र नागा मंदिर, नेहरु चौक, बाजीप्रभु नगर, पंचवटी नगर, स्नेहनगर,पॉवर लुम,इंडस्ट्रीयल एरिया,माणिक नगर,शास्त्री नगर,नाथ नगर,शिवाजी नगर,जिव्हेश्वर नगर,न्यू माणिक नगर माणिक नगर आदी भागात  प्रचारफेरी काढली. पंकजाताई यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात थेट केंद्र सरकारच्या योजना आणुन मोठे प्रकल्प उभारुन रोजगार निर्मितीसाठी साथ द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रचारफेरीचा समारोप माणिकनगर येथे करण्यात आला.

मतदारांकडून प्रचारफेरीचे स्वागत
—-
या व्यापक प्रचारफेरीचे मतदार,नागरीकांनी आपापल्या भागात स्वागत केले.प्रचारफेरीत महिलांचा सहभाग लक्षणीय होता.स्वंयस्फुर्तीने सहभागी झालेले महायुतीचे कार्यकर्ते पंकजाताई यांना परळी शहरातुन मोठे मताधिक्य देण्यासाठी या रॅलीच्या माध्यमातुन एकवटल्याचे दिसून आले.

error: Content is protected !!