ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

चला चला, चला चला मतदानाला….. या गीताच्या माध्यमातून मतदार जनजागृती..

चला चला, चला चला मतदानाला….. या गीताच्या माध्यमातून मतदार जनजागृती..

 

जिंतूर प्रतिनिधी- दिनांक १५ एप्रिल रोजी अंबरवाडी, करंजी, बामणी, पांगरी, वाडळी, माथला, कडसावंगी या गावामध्ये स्वीप पथकाद्वारे मतदार जनजागृती करण्यात आली.  भारतीय निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हास्तरीय स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगीता सानप, तहसीलदार जिंतूर तथा 95 जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरवदे, तहसीलदार सेलू तथा 95 जिंतूर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश झांपले, नायब तहसीलदार निवडणूक सुग्रीव मुंडे  यांच्या नियोजनानुसार मतदार जनजागृती कार्यक्रम सुरू आहे.  लोकशाही बळकट आणि सक्षम करण्यासाठी निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत मतदारांचा जागरूकतेने उत्स्फूर्त मोठ्या सहभागाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक निवडणुकीत सर्व मतदारांनी जागरूकतेने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. जागरूक मतदार लोकशाही बळकट करतात. सक्षम लोकशाहीमध्ये मतदानाची टक्केवारी प्रचंड मोठी असते. मतदानाचा दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो. तरुण मतदारांनी जागरूकतेने, जबाबदारीने आणि सजगतेने मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. यासोबत तरुणांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.  आपल्या संपर्कातील प्रत्येक मतदाराचे प्रबोधन तरुण मतदान करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. मतदानाबाबतची निरसता, नैराश्य दूर केले पाहिजे. मतदानाचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस असे न समजता आपली सर्व कामे सांभाळून मतदानाच्या दिवशी प्राधान्याने मतदान केले पाहिजे. दिनांक 26/04/2024 रोजी सकाळी 07 ते संध्याकाळी 06 या वेळेत सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे अशा प्रकारचे प्रबोधन तालुकास्तरीय मतदार जनजागृती व सहभाग कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले स्वीप सदस्य मयूर जोशी, राजेंद्र ढाकणे यांनी केले.

स्वीप पथकातील सदस्य आणि साहित्यिक मयूर जोशी यांनी

(ताई, माई, बाई, अक्का

जागे व्हा रे सारे जण

दादा, भाऊ, मामा, काका

करा करा मतदान….)

कवी गौतम खिल्लारे यांनी (चल जोडीन मतदान करू या….) कवी शंकर माने यांनी (लोकशाहीचा सण हा आला…. चला चला, चला चला मतदानाला) या आशयगर्भ गीताच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

या गीतांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अंबरवाडी, करंजी, बामणी, पांगरी, वाडळी, माथला, कडसावंगी या गावामध्ये चुनाव पाठशाळा, चौका-चौकात लोकशाही गप्पा, पथनाट्य याद्वारे स्वीप पथकाने मतदार जनजागृती केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात नवमतदार, महिला मतदार, दिव्यांग मतदार, ज्येष्ठ नागरिक मतदार, आणि सर्वच मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले.

error: Content is protected !!