ब्रेकिंग न्युज
स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळे

स्वाभिमानी ऊसतोड कामगारांनी ‘नोटा’ ला मतदान करावे-पांडूरंग आंधळे

स्वाभिमानी ऊसतोड कामगारांनी ‘नोटा’ ला मतदान करावे-पांडूरंग आंधळे

बीडप्रतिनिधी;- सद्या लोकसभा निवडणुकीची राज्यभर सर्वत्र धामधुम सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक मत मागण्यांसाठी नव-नवीन आमिष दाखवून मतदार बांधवांना भूल थापा देत आहेत ऊसतोड मजुरांचे अनेक प्रश्न प्रलंबित असतांना सत्ताधारी व विरोधकांनी ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाबाबत गेले अनेक वर्षांपासून फक्त मतांचे राजकारण केले आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी ऊसतोडणी कामगार कोणत्याही पक्षाला मतदान न करता नोटाला मतदान करुन आपला पर्याय निवडावा असे आवाहन पत्रकाद्वारे  महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतुक मुकादम कामगार युनियनचे राज्य उपाध्यक्ष पांडूरंग वामनराव  आंधळे यांनी केले आहे.
पुढे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वर्षानुवर्षे ऊसतोड कामगार न्यायहक्कापासून वंचित असून स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ऊसतोड कामगार पोरका झाला आहे.   दि.13.04.2015 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 20 % दरवाढ घोषित केली होती. मात्र अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे  ऊसतोड कामगारांची फसवणूक झाल्याची तीव्र भावना कामगार वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. ऊसतोडणीचे काम हे अत्यंत परिश्रमाचे आहे परंतू कामगारांना त्याचा योग्य मोबदला मिळत नाही. ऊसतोडणी यंत्राला सुद्धा प्रत्यक्ष काम करणार्‍या कामगारापेक्षा जास्त मोबदला मिळतो. स्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब व स्व.बबनराव ढाकणे यांच्या प्रयत्नातून ऊसतोड कामगारांना एकवेळ भरीव दरवाढ पदरात पडली होती त्यानंतर ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नांबद्दल कुणीच प्रभावीपणे आवाज न उठविल्यामुळे कामगार योग्य मोबदल्यापासून वंचित आहेत. शरद पवार साहेब साखर कारखानदारांचे हितसंबंध जोपासतात मात्र स्वतःला ऊसतोड कामगारांचे नेतृत्व म्हणून घेणार्‍या  पंकजाताई मुंडे मात्र प्रत्येकवेळी करार करतांना बोटचेपी भूमिका घेत आलेल्या आहेत. वास्तविक पाहता ऊसतोडणी करार हा दरवर्षी होणे गरजेचे असतांनाही  सत्ताधारी व विरोधक संगनमताने परस्पराचे हित जोपासत 3 वर्षाला करार करतात त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांना धडा शिकवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी ऊसतोडणी कामगार कोणत्याही पक्षाला मतदान न करता बीडसह संपुर्ण महाराष्ट्रात नोटाचा पर्याय निवडला आहे त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांना  यामधून चांगलीच सणसणीत चपराक बसेल असे महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतुक मुकादम कामगार युनियनचे राज्य उपाध्यक्ष पांडूरंग वामनराव आंधळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

error: Content is protected !!