ब्रेकिंग न्युज
घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनआरटीईचा घोळ संपला, उद्यापासून भरता येणार ऑनलाइन अर्ज, हा केला महत्वाचा बदलमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना वादळाचा बसणार तडाखा; ताशी 40 KM वेगाने वाहणार वारेलोकशाहीचा उत्सव साजरा होत असतानाच पिंपरनई गावावर शोककळा; विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने विवाहितेचा मृत्यू:- डॉ.गणेश ढवळेसीमा सिंग यांनी आयोजित केला कार्यक्रम  ‘इनस्पायरिंग मदर्स ‘मेघश्रेय फाउंडेशनतर्फे विविध महिलांचा करण्यात आला गौरवलिंबागणेश सर्कल मध्ये  तुतारीच वाजणार ; सर्वसामान्य मतदार बजरंग बाप्पाच्या पाठीशी 

बीडकरांना आदर्श शिंदेंच्या भीमगीतांची मेजवानी

बीडकरांना आदर्श शिंदेंच्या भीमगीतांची मेजवानी
आ. संदीप क्षीरसागरांकडून सनी आठवलेंची जयंती उत्सव अध्यक्षपदी निवड
बीड दि.१५ (प्रतिनिधी) :- दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती समितीच्या वतीने बीडकरांना आदर्श शिंदेंच्या भीमगीतांची मेजवानी मिळणार आहे. या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आ.संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत सनी आठवले  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
              गेल्या अनेक वर्षांपासून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीकडून बीड शहरात आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो, सालाबादप्रमाणे यावर्षीही शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे २३ एप्रिल रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  दरम्यान क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आ.संदीप क्षीरसागर यांनी सर्वानुमते सनी शामराव आठवले यांची निवड केली आहे. याबाबत सोमवार (दि.१५) रोजी राष्ट्रवादी भवन येथे बैठक पार पडली.
error: Content is protected !!