ब्रेकिंग न्युज
वाढदिवसाचे औचित्य साधत”महावीर के रोटी” उपक्रमांतर्गत अन्नदान स्मशानभूमी अभावी अंत्यसंस्कार करताना वाद ही लाजीरवाणी बाब मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला सोयरसुतक नाही:- डॉ.गणेश ढवळेसोयाबीन पेरणी पूर्वी उगवण क्षमता तपासा :- कृषी विभागाचे आवाहन.स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कारजामखेड कृषी उत्पन्न बाजारचे सभापती पै. शरद कार्ले यांच्या सभापती पदाची वर्षपुर्ती.घाटशीळ पारगावात व्यापाऱ्याला मारहाणटँकरने पाणी पुरवठाबाबत अडचणी आल्यास संपर्क क्रमांकावर तक्रार करावीजातेगाव येथे शिव पुराण कथा व कीर्तन महोत्सवजामखेड येथे मधूरजल प्युअर वाॅटर चे उद्घाटन संपन्नरणविर काका पंडीत यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

विकासाभिमुख नेतृत्व पंकजाताई मुंडे यांना निवडून द्या-डॉ.योगेश क्षीरसागर

विकासाभिमुख नेतृत्व पंकजाताई मुंडे
यांना निवडून द्या-डॉ.योगेश क्षीरसागर
पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ लिंबागणेश जि.प. गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक
बीड ;-दि.१५ : ग्रामीण भागाचा कायापालट पंकजाताई मुंडे या ग्रामविकास मंत्री असताना झाला. त्यांच्या काळात विकासासाठी कोट्यवधींचा निधी आला. विकासाभिमुख नेतृत्व असलेल्या महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले आहे.
पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ लिंबागणेश येथे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी (दि.१५) पार पडली. यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर हे बोलत होते.
यावेळी डॉ.सारिकाताई क्षीरसागर, ज्येष्ठ नागरिक राजाभाऊ गिरे, बाळकृष्ण थोरात, अजिनाथ वणवे, बाबासाहेब खिल्लारे, उद्भव अंकुशे, सरपंच बालासाहेब जाधव, रामकृष्ण कदम, अमोल बागलाने, ॲड.भालचंद्र भंडाने, बाळासाहेब बजगुडे, गणेश बडगे, विठ्ठल शेळके, समीर शेख, शहादेव खोसे, सचिन बहिरवाल, दिलीप शेळके, अशोक वेदपाठक, शिवराज माने, दशरथ ढगारे, सुसेन ढास, हनुमान रंदवे, प्रशांत ढास, नानासाहेब कदम, कृष्णा कानडे, पांडुरंग रंदवे, उत्तरेश्वर मांडवे, कचरू रणखांब, गणपत घोलप यांच्यासह पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
बीडमध्ये कॅनॉल रोड परिसरात कॉर्नर बैठक
बीड शहरातील कॅनॉल रोड परिसरातील महाराष्ट्र बँक कॉलनी येथे पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ सोमवारी सायंकाळी कॉर्नर बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी विकासाचा लेखाजोखा मांडला. याप्रसंगी माजी नगरसेवक भास्करराव जाधव, संजय होळकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष शुभम कातांगळे, वाघमारे, मतिन शेख, मिलिंद ओव्हाळ, माजेद कुरेशी, आशा कानडे, माऊली मार्कड, अक्षय पंडित यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!